breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#Covid-19: भारताला मदत करणे श्रीमंत देशांची जबाबदारी!

नवी दिल्ली |

करोनाच्या सध्याच्या संकटाविरुद्ध लढण्याकरिता भारताला पुरेशी मदत करण्यात जगभरातील देश अपयशी ठरले असून अशा परिस्थितीत मदतीचा हात देण्याबाबत श्रीमंत देशांनी अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी, असे व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी म्हटले आहे. जागतिक महासाथीला पुरेसा प्रतिसाद जगभरातून प्रतिसादाच्या मार्गानेच दिला जाऊ शकतो आणि जागतिक प्रतिसाद म्हणजे जगभरातून समन्यायी मदत होय.

तथापि, दुर्दैवाने हे साध्य झालेले नाही. तुलनेने श्रीमंत असलेल्या किंवा अधिक उत्पन्न असलेल्या सर्व देशांना याबाबतीत अधिक लक्ष घालायला हवे, असे डॉ. फौची यांनी ‘गार्डियन ऑस्ट्रेलिया’ला सांगितले. भारतात सध्या करोना महासाथीने थैमान घातलेले आहे. अशावेळी किमान १७ देश भारताला मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यात शेजारी देशांपासून जगातील महासत्तांचा समावेश आहे.

‘कोव्हॅक्सिन प्रभावी’

भारताने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या स्वेदेशी लशीमध्ये करोनाच्या ६१७ या प्रकाराला निष्प्रभ करण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे, त्यामुळे भारतात अनेक अडचणी असतानाही करोनाच्या विरोधात ही लस अतिशय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक औषध ठरू शकते, असेही मत डॉ. फौची यांनी व्यक्त केले.

वाचा- #Covid-19: महाराष्ट्राला पाच लाख अधिक लसमात्रा मिळणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button