breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

COVID 19 : शहरातील 10 लाख नागरिकांची तपासणी, 35 हजार 83 जण ‘को-मॉर्बिड’

  • माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानाला प्रतिसाद
  • सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार महापालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ अभियान शहरात राबवित आहे. या मोहीमेसाठी १ हजार ३४९ सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आजअखेर ३ लाख 29 हजार कुंटुबांतील एकूण १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 हजार 83 नागरिकांना काही विकारांची बाधा असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्‍याची सुचना राज्य शासनाने दिली. त्याअंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेत आजपर्यंत उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. नागरिकही मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घेत आहेत. तसेच, प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीमला सहकार्य देखील करीत असून ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यास मदत होत आहे.

शहराची एकुण लोकसंख्या २४ लाख ४ हजाराच्या जवळपास असून आजअखेर लोकसंख्येच्या ४३ टक्के म्हणजेच १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पुर्ण झाली आहे. यामध्ये ३५ हजार 83 नागरीक ‘कोमॉर्बिड’ आढळून आले आहेत. तरी पुढील १० दिवसात उर्वरीत नागरिकांची तपासणी करणेत येणार असल्याने नागरिकांनी गृहभेटी देणाऱ्या महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button