breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 88 हजारांवर

मेक्सिकोत आतापर्यंत 8 लाख 91 हजार 160 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 88 हजार 924 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

मेक्सिकोत रविवारी 6025 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 431 जणांचा मृत्यू झाला. 8.91 लाख रुग्णांपैकी 6 लाख 50 हजार 355 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 51 हजार 881 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2781 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात नववा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 22 लाख 88 हजार 589 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button