breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: इंडिगो विमान कंपनीच्या देशांतर्गत प्रवासी संख्येत 30% घट

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे परिणाम आता हळू हळू दिसू लागले आहे… कोरोनामुळे लोक घरीच थांबणचं पसंत करत आहेत…त्याच प्रमाणे कोरोनाचा परिणाम लोकांप्रमाणे अनेक वाहतूकींवरही पडला आहे….त्यातच याचा सर्वांत मोठा फटका हवाई वाहतूक क्षेत्रालाही बसला आहे. यामुळेच हवाई वाहतूक क्षेत्रातील दोन कंपन्या आपली विमान उड्डाण मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

इंडिगो विमान कंपनीच्या देशांतर्गत प्रवासी संख्येत ३० टक्के घट झाली आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या निर्देशांमुळे कंपनीची आंतरराष्ट्रीय वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कंपनी काही गंभीर निर्णय घेण्याच्या विचारात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे विस्ताराने आपल्या पहिल्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर्सची डिलिव्हरी घेणे पुढे ढकलले आहे, अशी माहिती आणखी एका अधिकाऱ्याने दिली.

देशातील एकूण परिस्थिती पाहता या दोन्ही विमान कंपन्या येत्या काळात आपली काही विमान उड्डाणे रद्द करू शकते. ब्रिटिश एअरवेजनही आपली काही विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे…

सध्या तरी कोणत्याही विमान कंपनीने देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात केलेली नाही. पण येत्या काळात परिस्थिती बघून काही गंभीर निर्णय घ्यावी लागू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button