breaking-newsआंतरराष्टीय

चीन साठी हेरगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला अमेरिकेत अटक

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने चीन कडून 8 लाख अमेरिकन डॉलर्सची लाच घेऊन देशाची अत्यंत महत्वाची लष्करी माहिती चीनला पुरवल्याचे उघड झाल्याने या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. रॉन रॉकवेल हॅन्सेन असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते 58 वर्षीय आहे.

अमेरिकन लष्कराची अत्यंत गुप्त महत्वाची माहिती घेऊन हा अधिकारी सीएटल येथील विमानात बसून चीनकडे जात असताना त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली. चीनने अमेरिकेत सध्या अनेक गुप्तहेर पेरले असून त्या प्रकरणात झालेली ही आणखी एक अटक आहे.

हेन्सेन हा अमेरिका लष्करात कार्यरत होता. तेथून तो निवृत्त झाल्यानंतर गुप्तचर विभागाच्या सिग्नल विभागात कार्यरत होता. तो माद्रियन आणि रशियन भाषेत पारंगत आहे. त्यामुळे त्याला अमेरिकच्या इंटेलिजन्स विभागात घेण्यात आले होते. त्याचे चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत असेही तपासात निष्पन्न झाले आहे. चीनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना तो नेहमी भेटत असे. चीनने त्याला एक मोबाईल फोन दिला होता. त्याद्वारे तो चीनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होता.

सन 2013 ते 2016 या अवधीत तो अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला होता. त्या काळात त्याला चीनकडून तब्बल 8 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली होती. त्याने चीनचे अनेक वेळा दौरे केले असून त्यावेळी तेथून तो मोठ्या प्रमाणात पैसे आणायचा. त्यामुळे त्यावरील संशय बळावला होता. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा त्याच्यावर पाळत ठेऊन होता. त्यांनीच त्याला अखेर शनिवारी विमानतळावर रंगेहाथ पकडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button