TOP Newsमहाराष्ट्र

स्वित्झर्लंडच्या अॅडॅप्ट्रिसिटी एजीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना निमंत्रण

मुंबई l प्रतिनिधी

वीज मिटर, पॉवरग्रिड सिम्युलेशन, इंटेलिजेंट ग्रिड प्लॅनिंग आणि मॉनिटरिंग सोल्यूशन्स या क्षेत्रात विशेष ओळख असलेल्या अॅडॅप्ट्रिसिटी एजी या स्वित्झर्लंडमधील कंपनीने राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांना स्वित्झर्लंड येथे विशेष आमंत्रित केले आहे.

महाराष्ट्रातील व्यवहार्यता अभ्यासासाठी त्यांच्या उत्पादनांचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने, कंपनी सीटीओ स्टीफन कोच यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आगामी उपक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

अॅडाप्ट्रिसिटी ही स्वित्झर्लंड स्थित कंपनी असून तिला ऊर्जा मीटरच्या निर्मितीचा सखोल अनुभव आहे. त्यांची अनेक देशांमध्ये उपस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा मीटरचा पुरवठा ते करतात. त्यांच्याकडे स्मार्ट मीटरचा पुरवठा करण्याचा दांडगा अनुभव आहे. स्मार्ट मीटरमुळे तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी व वीजचोरी कमी होण्यास मदत होते, ग्रीड व्यवस्थापन आणि विजेचा तुटवडा असल्यास भारव्यवस्थापन कमी करण्यात या मीटर्सची मदत होते. प्रीपेड आणि पोस्ट-पेडया दोन्ही सुविधा असल्याने हे मीटर्स वीज वितरण कंपनीसाठी व्यवहार्य ठरते. या मीटरमुळे रिमोट डिस्कनेक्शन आणि रिकनेक्शन सहज शक्य असल्याने मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात बचत होते. या मीटरचा वापर केल्यास महावितरणची आर्थिक स्थिती आणि कार्यक्षमता निश्चितच वाढेल असा विश्वास अॅडॅप्ट्रिसिटी एजीने या कंपनीने व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button