breaking-newsपिंपरी / चिंचवड

COVID 19 : च-होलीत आजपासून कडकडीत बंद, ग्रामस्थांचा निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी च-होली येथील ग्रामस्थांनी आजपासून सलग तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला च-होलीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व व्यावसायिकांनी आपला व्यवसाय, दुकाने तसेच दळवणवळणाची सर्व साधणे बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.

च-होलीत कोविड 19 विषाणुचा संसर्ग झापाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आजअखेर एक हजारहून अधिक पॉझीटिव्ह पेशंट सापडले आहेत. तर, सुमारे 40 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर च-होलीतील समस्त ग्रामस्थांनी आजपासून पुढील तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रत्येक घरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार यांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. आज गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार (दि. 16) पर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.

कोरोना विषाणुला रोखण्यासाठी बंद पाळणे गरजेचे आहे. आपण आज सतर्कता बाळगली नाही, तर उद्याचा दिवस आपल्यासाठी वेदनादायक असणार आहे. कोरोना विषाणुला अटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून आपण तीन दिवसांचा बंद पाळत आहोत. त्याला च-होलीतील प्रत्येक नागरिकाने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन माजी महापौर नितीन काळजे यांनी नागरिकांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button