breaking-newsव्यापार

Honda Forza 350 मॅक्सी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

होंडाने आपली नवीन Forza 350 मॅक्सी स्कूटर थायलंडमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या स्कूटरच्या स्टॅंडर्ड व्हेरिएंटची किंमत हिंदुस्थानी चलनात 4.16 लाख रुपये इतकी ठेवली आहे. तसेच टूरिंग व्हेरिएंटची प्रारंभिक एक्स शोरूम किंमत 4.35 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या स्कूटरच्या फीचर्स आणि इतर खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

नवीन Honda Forza 350 सध्याच्या मॉडेलसारखीच दिसते. मात्र यात नवीन कलर्स ऑप्शन देण्यात आले आहे. पुढून पाहिल्यास ही स्कूटर अधिक आकर्षक दिसते. फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात कंपनीने इलेक्ट्रिकली अ‍ॅडजेस्टेबल विंडस्क्रीन, एलईडी लाईट, कीलेस इग्निशन, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जर देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये फोन आणि पाण्याची बाटली ठेवण्यासाठी स्पेस देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरमध्ये सीटच्या खाली दोन हेल्मेट ठेवण्याची जागा देण्यात आली आहे. Honda Forza 350 मध्ये 329.6 सीसी सिंगल सिलिंडर, 4 व्हॉल्व, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. याच्या टॉर्क आणि पॉवरची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button