breaking-newsराष्ट्रिय

नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात ११ जवान जखमी

झारखंडमधील सरायकेला येथे नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात ११ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रांची येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मंगळवारी पहाटे सरायकला येथे कोब्रा फोर्स आणि झारखंड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जंगलात विशेष मोहीम राबवली. यादरम्यान नक्षलींनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. सकाळी पाचच्या सुमारास हा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात कोब्रा फोर्समधील ८ जवान आणि झारखंड पोलीस दलातील तीन जवान जखमी झाले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ANI

@ANI

: The 11 injured jawans were airlifted for Ranchi at 6:52 AM. More details awaited.

ANI

@ANI

An Improvised Explosive Devices (IED) exploded at 4:53 am in Kuchai area of Saraikella on the troops of 209 CoBRA and Jharkhand police who were out on special operations. 8 CoBRA personnel & 3 Jharkhand police personnel injured. #Jharkhand

39 people are talking about this

गेल्या काही महिन्यांमध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये नक्षलींच्या कारवाया वाढल्या आहेत. दंतेवाडा जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी नक्षलवादी हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या गाडीत सुरक्षा दलातील चार जवानही होते. ते देखील या हल्ल्यात शहीद झाले होते. यानंतर १ मे रोजी नक्षलींनी गडचिरोलीत भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. तर खासगी वाहनाच्या चालकाचाही यात मृत्यू झाला होता. १ मे रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार १५ जवान घटनास्थळाच्या दिशेने जात असताना जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात हे जवान शहीद झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button