पिंपरी / चिंचवड

भरधाव दुचाकीची डिव्हायडरला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

भरधाव दुचाकीने रस्त्यातील डिव्हायडरला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 25) रात्री अकरा वाजता निघोजे गावच्या हद्दीत निघोजे ते स्पायसर चौकाकडे जाणा-या रस्त्यावर घडला.

प्रवीण दिलीप तिकटे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विधेवान प्रल्हादराव बनसोडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दुचाकीस्वार प्रवीण हा त्याची दुचाकी घेऊन डोंगरेवस्ती निघोजे येथून स्पायसर चौकाकडे भरधाव वेगात जात होता. ए आर आय कंपनीजवळ आल्यानंतर त्याने रस्त्याच्या डिव्हायडरला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस फौजदार संजय घाडगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button