breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

COVID 19 : उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब आगार वगळता अन्य आगाराच्या बसेस शुक्रवारपासून धावणार

उस्मानाबाद| महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना विषाणु (COVID – 19)चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब या तीन नगर परिषद क्षेत्रातील बस स्थानके वगळता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी घेतला आहे.

दि. 22.05.2020 पासून पुढील आदेशापर्यंत बस सेवा चालू ठेवणेस खालील अटी व शर्तीवरनुसार परवानगी देण्यात आली आहे.

1. उस्मानाबाद , तुळजापूर व कळंब या तीन नगर परिषद क्षेत्रात असणा-या बस स्थानकांमध्ये बस वाहतूक करण्यास परवानगी असणार नाही.

2. उस्मानाबाद जिल्ह्याचे सीमांतर्गत बस वाहतूकीस परवानगी असेल. जिल्ह्याचे सीमेबाहेर बस वाहतूक करता येणार नाही.

3. बसच्या प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी असेल.

4. बसच्या प्रत्येक नविन फेरीपूर्वी व फेरी पूर्ण झाल्यानंतर बसची स्वच्छता तसेच निर्जतूकीकरण (Sanitization) करणे बंधनकारक राहील.

5. बसचे चालक व वाहक यांनी नियमितपणे मास्क , हॅण्डग्लोव्हज, गॉगल्स, फेस शिल्ड, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

6. बसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांनीही मास्क / स्वच्छ रुमालाचा वापर करणे बंधनकारक राहील.

7. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती ( SOP ) चे पालन करणे बंधनकारक राहील,

8. बसमध्ये चढत असताना तसेच बसमधून उतरत असताना प्रवाशांनी सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक राहील. यादृष्टीने प्रवाशांना सूचना देणे व आवश्यक कार्यवाही करणेच्या सूचना वाहकांना देण्यात याव्यात.

9. बस स्थानकांची व त्यांचे परिसराची वारंवार स्वच्छता, निर्जतूकीकरण ( Sanitization ) करणे’ बंधनकारक राहील.

10. बस स्थानकांवरील उपहारगृहे ( Canteens ) चालू ठेवण्यास परवानगी असणार नाही.

11.बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी होणार नाही यादृष्टीने बसच्या फे-यांचे नियोजन करण्यात यावे.

12. उस्मानाबाद जिल्ह्यातील कन्टेन्मेन्ट झोन ( प्रतिबंधीत क्षेत्र ) मध्ये बस वाहतूकीस परवानगी असणार नाही.

13.65 वर्षावरील व्यक्ती , दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती , गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांना बसमधून प्रवासाची परवानगी असणार नाही.

14.बसचे चालक, वाहक यांना तसेच प्रवाशांना त्यांचे हाताने त्यांचे नाक, तोंड व डोळ्यांवर स्पर्श न करणेबाबत सूचित करावे.

15. बसस्थानकावर ध्वनीक्षेपकाद्वारे प्रवाशांना सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या सूचना तसेच कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या व वेळोवेळी प्राप्त होणा-या सूचना वारंवार देण्यात याव्यात व या सूचनांचे पालन करणेबाबत वारंवार सूचित करावे.

16. शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

17.सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच उपरोक्त वाचा क्र . 2 मधील ” महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020 ” चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860 ) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button