breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राफेल खरेदीत कॅगचा ठपका; डसॉल्ट एव्हिएशनने भारताला तंत्रज्ञान अद्याप दिलेले नाही

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीच्या डिफेन्स ऑफसेटवर कॅगचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ३६ राफेल विमानांच्या खरेदीतील ऑफसेट करारानुसार डीआरडीओला उच्च तंत्रज्ञान देण्याचे वचन अद्याप फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनने पूर्ण केलेले नाही, असा ठपका ठेवला आहे. त्यामुळे राफेलवरून सरकारला घेरणाऱ्या विरोधकांना आयताच हा एक नवा मुद्दा मिळाला आहे.

भारतीय बनावटीच्या तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचे इंजिन विकसित करण्यासाठी डीआरडीओला या तंत्रज्ञानाची गरज आहे. परंतु राफेलच्या विक्रेती डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने हे तंत्रज्ञान अद्याप दिलेले नाही, असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे संबंधित मंत्रालयाने या धोरणाचा आढावा घेण्याची, समीक्षा करण्याची आणि त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे कॅगने अहवालात म्हटले आहे. डसॉल्ट एव्हिएशनने राफेल जेट्स बनवली आहेत. एमबीडीएने त्यात क्षेपणास्त्र प्रणाली बसवली आहे. परंतु विदेशी विक्रेता कंपनी भारताला तंत्रज्ञान दिल्याचे कुठेही आढळलेले नाही, असे कॅगने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button