breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#Covid-19: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump आणि त्यांची पत्नी Melania Trump यांना कोरोनाची लागण
मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प यांची COVID 19 चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. दरम्यान डॉनल्ड ट्र्म्प यांचे सहाय्यक सहकारी Hope Hicks यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प आणी त्यांची मेलानिया ट्र्म्प यांची देखील कोविड 19 ची चाचणी करून घेण्यात आलेली होती.
आता ती पॉझिटिव्ह आली असून सध्या दोघेही क्वारंटीन असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. डॉनल्ड ट्र्म्प यांनी काही वेळापूर्वीच ट्वीटर अकाऊंटवरून त्यांना व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली असून आम्ही एकत्र यामधून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.