ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

भाजप नेते अनिल बोंडेंना न्यायालयाचा दणका

२० हजारांच्या दंडासह तीन महिने कारावास

अमरावती |वरुडच्या नायब तहसिलदारांना मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासासह २० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अनिल बोंडे यांना न्यायालयाने हा दणका दिल्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  rs 20000)

वरुडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री बोंडे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती. त्यावेळी त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. सदर घटना सन २०१७ मध्ये घडली होती. आमदार असताना बोंडे नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. यातूनच त्यांनी नायब तहसिलदारांना मारहाण केली होती. या प्रकरणी अखेर सत्र न्यायालयाने बोंडेंना शिक्षा सुनावली असून न्यायालयाने डॉ. भोंडे यांना तीन महिने कारवास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अपमानकारक भाषा वापरल्याबद्दल आमदार अनिल बोंडे हे नुकतेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी आझाद मैदान पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी बोंडे यांच्यासह नागपूर पूर्व मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे, भाजयुवामो जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस हेही आरोपी आहेत. डॉक्टर गुंडे यांना न्यायालय नाही दंड ठोठावला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button