breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर सर्वत्र खळबळ उडाली. यासंदर्भात राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता आणखी एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता पोलिसांना सर्वच जणांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.

ठाण्यात किती जणांकडे बंदुकीचे परवाने

ठाण्यात आतापर्यंत जवळपास ४ हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहे. त्यात अनेक राजकारणी, बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश आहे. राजकारणी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यात अग्रस्थानी आहेत. आता या प्रकरणानंतर ठाणे पोलीस सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत.

हेही वाचा    –    भारताचा ग्रॅमी पुरस्कारात जलवा! जाकिर हुसैन, शंकर महादेवन यांना पुरस्कार 

…तर लायसन्स रद्द होणार

पोलीस पडताळणीत आता बंदुकीचे लायसन्स का हवे? ती कारणे जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर आवश्यकता नसल्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे आता कोणालाही बंदूक बाळगता येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button