breaking-newsमहाराष्ट्र

#CoronoVirus:नांदेडमध्ये चोवीस तासात दोघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

नांदेड : देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान नांदेडमध्ये चोवीस तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांची धाकधूक वाढली आहे.

नांदेडमध्ये काल (30 एप्रिल) आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने नांदेडच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच येथील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

नांदडेमध्ये एका दिवसात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मृत झालेले रुग्ण एक सेलू आणि दुसरा पीर बु-हाननगर येथे राहत होते. मृतांमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना इतर गंभीर आजारही होते.

या महिलेवर नांदेडच्या विष्णुपुरीच्या शासकीय दवाखान्यात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच या महिलेचा काल रात्री 10.15 वाजता मृत्यू झाला. 29 एप्रिलला या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button