breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#coronovirus:कोरोनाच्या उपचारासंदर्भात मोठी बातमी, महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

मुंबई: जीवघेण्या कोरोना उपचारासंदर्भात मोठी बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून शुक्रवारी मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.  राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली.

याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर व एक्स-रे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, कोरोना विषाणूच्या उपचारात दिल्लीत मोठं यश आलं आहे. दिल्लीत प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेण्यात आली. प्रारंभिक चाचणीचा निकाल सकारात्मक आला आहे. याच धर्तीवर आता केंद्राने महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी घेण्यास मंजुरी दिली आहे. आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोनमध्ये जलद गतीने चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे प्लाझ्मा थेरपीची परवानगी मागितली होती. आता मुंबई व कोल्हापूरमध्ये प्लाझ्मा थेरपीचा सर्वप्रथम वापर करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button