breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus | परभणीत आणखी दोन नवे रुग्ण

परभणी | परभणी जिल्ह्यात लाॅकडाउनच्या चार टप्प्यापैकी तीन टप्प्यांमध्ये एकच रुग्ण आढळला होता. मात्र चौथ्या लाॅकडाउनमध्ये रुग्ण संख्या 82 वर जाऊन पोहोचली तर आता अनलॉक एक मध्येही रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी उपचारानंतर घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय ठरली आहे. यामुळे परभणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यापासून सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पाथरी तालुक्यात मात्र आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे पाथरी तालुक्यातील रामपूर येथे एक रुग्ण बुधवारी रात्री पॉझिटिव आढळून आल्याने पाथरीकरांमध्ये चिंता वाढली आहे.

परभणी जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांमुळे परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीच बाधीत निघत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले. तीन लाॅक डाऊनमध्ये केवळ एकमेव रुग्ण जिल्ह्यात आढळून आला होता तोही पुणे येथून आलेला. यानंतर चौथ्या लाॅक डाऊन सुरू होताच रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली जिल्ह्यात आता 88 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. आतापर्यंत 25 जणांना डिस्चार्ज दिला होता तर बुधवारी रात्री सेलू तालुक्यातील आणखी तीन जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. ही परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी असली तरी सुरक्षित असलेल्या पाथरी तालुक्यात मात्र कोरोनाचा प्रथमच शिरकाव झाल्याने पाथरीकरांची चिंता आता वाढली आहे. एकंदरीतच परभणी जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे बाहेर गावाहुन आल्याचे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button