breaking-newsमुंबई

#Coronolockdown:बीडीडी चाळ 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईतील बीडीडी चाळ येथील कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठ दिवस बीडीडी चाळ पूर्णपणे सील असणार आहे. बीडीडी चाळीतल्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे महापालिकेने आणि मुंबई पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई जी-साउथमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही 871 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 305 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता सध्या बीडीडी चाळ पूर्णपणे बंद ठेवण्याची गरज असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. त्याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं. त्यानंतर बीडीड चाळ 8 दिवस पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button