breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: दिवसभरात सर्वाधिक रुग्ण बरे!
गेल्या चोवीस तासांत करोनाचे १,०७४ रुग्ण बरे झाले असून एकदिवसात बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २७.५२ टक्के झाले आहे. एकूण ११,७०६ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ४२,८३६ इतकी झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये २,५३३ रुग्णांची भर पडली आहे. २९,४५३ रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. तर, चोवीस तासांमध्ये ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू १३८९ झाले आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्याची तीव्रता कमी झाली आहे. १२ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत आहेत. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण तीन टक्के होते, असे अगरवाल यांनी सांगितले.