breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: Oxford-AstraZeneca च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला तात्पुरता ब्रेक

पुणे: कोरोना व्हायरसचा सामना करणार्‍या जगासाठी आता त्यावर ठोस उपाय, लस मिळवणं यासाठी अनेक संधोधक मेहनत करत आहे. अशातच आता शेवटच्या टप्प्यामध्ये असणार्‍या AstraZeneca या कंपनीच्या मानवी चाचणीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. Reuters च्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणात्सव लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. दरम्यान याबाबत मंगळवार, (8 सप्टेंबर) च्या रात्री कंपनीकडून त्याची माहिती देण्यात आली आहे. लस दिलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर ही चाचणी थांबवण्यात आली आहे. मात्र तो लसीचा साईड इफेक्ट आहे ही त्या व्यक्तीचा आजार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

त्यामुळे युकेमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनवल्या जाणार्‍या लसीला तूर्तास ब्रेक लागला आहे. मागील महिन्यामध्ये AstraZeneca ने अमेरिकेमध्ये 30,000 लोकांवर लसीची चाचणी सुरू केली होती. हा लसीच्या मोठ्या टप्प्यातील चाचणीचा एक भाग आहे. सध्या ब्रिटन सोबतच ही लस ब्राझील, भारत, दक्षिण अफ्रिकेमध्ये देखील तपासली जात आहे. दरम्यान सध्या अमेरिकेची Moderna Inc ने बनवलेली आणि Pfizer आणि जर्मनीच्या BioNTech ने बनवलेली लस. दरम्यान या लसी AstraZeneca पेक्षा वेगळ्या आहेत. दरम्यान लसीच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीमध्ये संशोधक पहिल्या दोन टप्प्यांत काही असे साईड इफेक्ट आहेत का? जे पाहणं राहून गेले आहे. ते तपासलं जातं.

तिसर्‍या टप्प्यांत मोठ्या प्रमाणात आणि विविध स्तरावर लस दिली जात असल्याने त्याचा प्रत्येकामध्ये दिसणारा परिणाम हा वेगळा असतो. त्यामुळे या टप्प्यातील अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोरोना व्हायरस हे जागतिक आरोग्य संकट आहे. त्यामुळे परिस्थिती पहता लसीच्या टप्प्यामध्ये कालावधी कमी करून पण त्याची सुरक्षा सार्‍या स्तरांवर तपासूनच बाजारात आणली जाणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्टाझेनेकाने दिलेल्या माहितीनुसार 2020 च्या शेवटापर्यंत त्यांची लस बाजारात आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button