breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वर्गणी महाराष्ट्रासाठी’ उपक्रम पिंपरी-चिंचवडकरांसाठी आदर्शवत!

उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मत

शिवसेना युवा नेते परशुराम आल्हाट यांचा विधायक पुढाकार

मोशीतील युवा नेत्या रुपाली आल्हाट यांचाही सक्रीय साथ

पिंपरी । प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटाचे सावट यावर्षी नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवावरही होते. गणेशोत्सवात लोकप्रतिनिधी सर्वच मंडळांना वर्गणी देत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवा नेते परशुराम आल्हाट यांनी ‘वर्गणी महाराष्ट्रासाठी’ हा विधायक उपक्रम हाती घेतला. पिंपरी-चिंचवडकरांसाठी हा उपक्रम आदर्शवत आहे, अशी भावना शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना युवा नेते परशुराम आल्हाट आणि मोशीतील सामाजिक कार्यकर्त्या रुपाली आल्हाट यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘वर्गणी महाराष्ट्रासाठी’ हा उपक्रम घेण्यात आला. त्यातून जमा झालेल्या निधी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे जमा करण्यात येणार आहे. त्याचा धनादेश शिवसेना उपनेते आढळराव पाटील यांच्याकडे सूपुर्त करण्यात आला.

यावेळी कामगार नेते व सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, महिला संघटिका भोसरी विधानसभा, रूपाली आल्हाट, युवा सेना जिल्हा समनव्यक सचिन मुटके, युवा नेते तुषार आल्हाट, ऍड संकेत चावरे, अमित आल्हाट, विनायक आल्हाट, मनोज आल्हाट, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

याबाबत परशुराम आल्हाट म्हणाले की, कोरोनामुळे देशावर तसेच महाराष्ट्रावर संकट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पूर्ण ५ महिने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली. आपण या समाजाचे घटक लागतो या भावनेतून राज्यातील नागरिकांनी राजकीय पुढारी, नेते मंडळीने मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.  एक शिवसैनिक म्हणून मी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री सहायता निधीत खारीचा वाटा म्हणून यावर्षी गणेशोत्सव मंडळांना वर्गणी न देता. ती वर्गणी महाराष्ट्रासाठी द्यायची, असा संकल्प आम्ही केला होता.

परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. त्यानसुार आम्ही हा उपक्रम यशस्वी केला. कोरोना काळातही सामाजिक उपक्रमात भर देण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत.

महाराष्ट्र हा आपल घर आहे आणि आपल्या घरावरती संकट आल्यानंतर आपण सर्व कुटुंबातील सदस्य ज्या ताकदीने संकटाना सामोरे जातो. त्याच पद्धतीने आपण सर्व एकत्र येऊन या संकटाला सामोरे जाऊया. प्रशासनाला सहकार्य करुया आणि कोरोनाला हरवूया!
परशुराम आल्हाट,
युवा नेते, शिवसेना, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button