breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाच्या लक्षणांचा अभाव

नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये कोविड-१९ च्या लक्षणांचा अभाव आढळला. या रुग्णांमध्ये कोविड-१९ ची लक्षणं अजिबात नव्हती किंवा आढळली तरी खूपच सौम्य स्वरुपाची होती. कोविड-१९ च्या लक्षणांमध्ये रुग्णांना ताप, सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास जाणवतो.

परंतु, अनेक रुग्णांना यापैंकी कोणताही त्रास जाणवत नाही. तरीदेखील त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह येते. परंतु, असे लोक संक्रमणाचं एक माध्यम बनू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घरातही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचा आणि घरातून बाहेर पडताना मास्क वापरूनच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलाय. कोविड-१९ च्या लक्षणांच्या अभावासंबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्रालयानं तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (Indian Council of Medical Research – ICMR) यासंबंधी माहिती दिली. चाचणी करण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असली तरी सध्या देशात सर्वांचीच चाचणी करणं शक्य नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button