breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मध्य प्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार

भोपाळ | अपेक्षेप्रमाणे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे नेते नरोत्तम मिश्रा यांच्यासह ५ नव्या मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. यात नरोत्तम मिश्रा यांच्यासह तुलसी सिलावट, कमल पटेल, गोविंदसिंह राजपूत, मीना सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रसला सोडचिठ्ठी देत भाजपत दाखल झालेले माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दोन समर्थकांचाही समावेश आहे.

तुलसी सिलावट यांना राज्याचे अर्थमंत्री देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.पक्षात बंडखोर म्हणून प्रसिद्ध असलेले कमल पटेल हे माजी मंत्री आहेत. त्यांच्यावर अवैध उत्खननाचे आरोपही झालेले आहेत. गोविंदसिंह राजपूत यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली असून ते ज्योतिरादित्य शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. तर, मीना सिंह या मंत्रिमंडळात पहिलाच महिला चेहरा आहेत. त्या मानपूरच्या आमदार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button