breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: हॉटेलमधल्या AC मुळे तीन कुटुंबांना झाली कोरोनाची लागण…

चीनमधील वुहान शहर हे करोना व्हायरसच्या प्रसाराचे मुख्य केंद्र आहे. जानेवारी महिन्यात वुहानमध्ये राहणारे एक कुटुंब गुआंगझोऊ येथील हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते. वुहानमध्ये त्यावेळी पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. वुहान आणि गुआंगझोऊ ही दोन वेगवेगळी शहरे आहेत.

वुहानमधून आलेल्या कुटुंबातील एका सदस्याला करोनाची लागण झाली होती. पण त्यांना त्याची कल्पनाच नव्हती. काही दिवसांनी त्याच हॉटेलमध्ये आलेल्या आणखी नऊ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली. गुआंगझोऊच्या त्या रेस्टॉरंटमध्ये जो एसी होता. त्या एसीच्या नळीतून करोना व्हायरसचा फैलाव झाला व त्या हॉटेलमध्ये आलेल्या तीन कुटुंबांना करोनाची लागण झाली.

गुआंगझोऊच्या याच हॉटेलमध्ये  आलेले अन्य ७३ जण आणि स्टाफला मात्र करोनाची बाधा झाली नाही. चीनच्या सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएंशनच्या रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी या घटनेचे उदहारण दिले आहे. तज्ज्ञांनी फॅमिली ए,बी आणि सी असे वर्गीकरण केले आहे. त्यातील फॅमिली ए मधील एकाला करोनाची लागण झाली होती.

२४ जानेवारीला हे कुटुंब डिनरसाठी गेले होते. वुहानमधून आलेल्या कुटुंबाच्या आसपास बसलेल्या आणखी तीन कुटुंबांमध्ये करोनाचा फैलाव झाला जानेवारीमध्ये करोना व्हायरस वुहानच्या बाहेर पसरला नव्हता. वुहानमधील फॅमिली ए ने अन्य दोन कुटुंबांपर्यंत हा व्हायरस पसरवला. स्क्षूम थेंबामध्ये सुद्धा करोनाचे विषाणू असतात. ते सहसा डोळयांना दिसत नाहीत. हॉटेलमधील एसीतून त्याचे संक्रमण झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button