Uncategorized
#CoronaVirus: सोलापुरात आज २२ नवे कोरोनाबाधित, एका महिलेचा मृत्यू
सोलापुरात आज २२ करोनाबाधित नवे रूग्ण आढळून आले. तर एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. एकूण रूग्णसंख्या ३३० वर पोहोचली असून मृतांचा आकडाही २२ पर्यंत वाढला आहे. तर, आज करोनावर मात केलेल्या २२ रूग्णांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. करोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या १०६ झाली आहे. सध्या २०२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.