breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

Lockdown: अबब… चक्क चेहरा लपवून बच्चू कडूंचा कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न, पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन करायला गेले आणि…

करोनामुळे राज्यातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असून नियंत्रण मिळवण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मतारी दिवस-रात्र करोना रुग्णांवर उपचार करत असून दुसरीकडे रस्त्यांवर पोलीसदेखील लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत आहेत. पोलीस आपलं काम व्यवस्थित करत आहेत की नाही हे तपासण्यासाठी राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू स्वत: रस्त्यावर उतरले होते. बच्चू कडू यांनी पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्टिंग ऑपरेशनच केलं.

बच्चू कडू यांनी बैदपुरा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये आपली ओळख लपवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. फाटे चौक येथे बच्चू कडू यांनी आपला चेहरा पोलिसांना दिसू नये यासाठी कापड गुंडाळलं होतं. दुचाकीवर मागच्या सीटवर ते बसले होते. पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्यांनी स्वत:देखील पोलिसांशी बोलणं टाळलं. त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती आपल्याला आत सोडा म्हणून पोलिसांकडे विनंती करत होती.

मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडलं नाही. याउलट कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याने सुनावलं. त्यामुळे बच्चू कडू यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय कठोरपणे नियमांची अमजबजावणी केली जावी अशा सूचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button