breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#CoronaVirus: शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची बाधा, कुटुंबातील दोघांना लागण
कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झालेली आहे. संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे.
यापूर्वी कोल्हापुरातील तीन आमदारांना कोरोनाची बाधा झालेली होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह दोघांना कोरोनाची बाधा झालेली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.