breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

नागपूर: नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंनी दिली आहे. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोणतीही लक्षण नाही. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे. दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी,” असे ट्विट त्यांनी केलेले आहे. तसेच “नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी पुढील काही दिवस मी घरातून काम करेन. आपण नक्की जिंकू,” असे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे.

दरम्यान नागपुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अनेक मास्टरप्लॅन केलेले आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी  तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलेलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button