breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चक्क… इनोव्हा कारमधून आजीबाई विकतात भाजी

माण गावातील 70 वर्षीय आजीबाई; हिंजवडी, बाणेर, सांगवी परिसरात भाज्यांची विक्री

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

वयाची साठ वर्षे ओलाडंली की बरेचजण घरी आराम करतात. घरामधील नातंवडांना सांभाळत निवांत राहणे असाच दिनक्रम ठरलेला असतो. मात्र, शेतकरी कुटूंबातील लोक हे त्याला अपवाद असतात. जोपर्यंत हात-पाय चालतात, तोपर्यंत काम करीत राहणे हे शेतक-यांचे काम असतं. त्यानूसार सत्तर वर्षीय आजीबाई ह्या आजही शेतातील ताज्या भाज्या विकून दररोज दिनक्रम घालवित आहेत. त्यातच या आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून भाजीपाला विकू लागल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

मुळशी तालुक्यातील माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हा गाडीत तो ठेवला जातो. सोबत त्यांचा मुलगा घेवून सकाळी 9 वाजेपर्यंत हिंजवडी, बाणेर, सांगवी पाषाण आदी परिसरात त्या भाजी विकतात. त्यांची इनोव्हा आता परिसरात परिचयाची झाल्याने लोकही गाडी दिसताच भाजी घेण्यास गर्दी करु लागले आहेत.

त्यांच्या गाडीत संक्रांतीनिमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि तीळ हे गावरान मिळत आहे. दररोज सुमारे आठ हजार रुपयांची भाजीपाला विक्री करत आहेत. गाडीमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, “यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोहचला आहे.” त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button