breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ३३ नवे रुग्ण; कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला ६२३ वर

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ३३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा ६२३ वर पोहोचला. तर उपचारांदरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३३ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १२, पनवेल ग्रामिणमधील १२, उरणमधील ४, खालापूर १, कर्जत १ महाड १ तर माणगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच पनवेल येथील दोन आणि कर्जत येथील एका रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २,३८२ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १,६८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, ६२३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच ७३ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २७० जणांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सध्या ३२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १३७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ७२, उरणमधील ९८, पेण ३, अलिबाग १, तळा येथील १, कर्जत २, खालापूर २, माणगाव १०, महाड २ तर पेणमधील एका करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत २६ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३०९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण तर १३ हजार ०३९ जणांचे घरात अलगीकरण करण्यात आले आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या २४ हजार ३८० जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button