breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: रायगडमध्ये दिवसभरात २३ रुग्ण

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत करोनाचे २३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १९० वर पोहोचली आहे. पनवेल मनपा हद्दीत १७, पनवेल ग्रामीण हद्दीत करोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील १२७८ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १०६० जणांचे अहवाल नकारात्मक आले. १९० जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले, तर २८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १२८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ८७, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३३, उरणमधील ३, श्रीवर्धनमधील १, कर्जतमधील १ तर अलिबागमधील २ तर महाडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button