breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: एका दिवसात महाराष्ट्रात १२३३ नवे कोरोना रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू
करोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसता महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६ हजार ७५६ वर पोहोचली आहे.