breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यात आणखी १२ करोनाबाधित, रुग्णसंख्या ६४

राज्यात आणखी १२ करोनाबाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६४ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. करोनाचे आज राज्यात १२ नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे संख्येत वाढ झाली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत आढळलेल्या ८ पैकी ६ जण परदेशातून प्रवास करुन आले आहेत. तर एकजण विमानतळावरचा कर्मचारी आहे असंही त्यांनी सांगितलं. तर आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

करोनाग्रस्त रुग्णांचा तपशील

पिंपरी चिंचवड -१२
पुणे -११
मुंबई १९
नागपूर ४
यवतमाळ ४
कल्याण ४
नवी मुंबई ३
अहमदनगर २
पनवेल १
ठाणे १
उल्हासनगर १
औरंगाबाद १
रत्नागिरी १
एकूण ६४ (मुंबईत एक मृत्यू)

२१ मार्च रोजी कुठे रुग्ण आढळले?

मुंबईत ८
पुणे येथे २
यवतमाळ १
कल्याण १
एकूण १२

२१ मार्च २०२० या एका दिवसात १२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ६४ झाली आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. उद्या होणाऱ्या जनता कर्फ्यूला जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद द्यावा असंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. गुरुवारी जनता कर्फ्यूचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलं होतं. तसेच येत्या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील असंही टोपे यांनी सांगितलं. नाईलाजास्तव मुंबईची लाईफलाईन बंद करण्याचा निर्णय घ्यायला लावू नका. स्वयंशिस्त पाळा आणि घरातून बाहेर पडू नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button