breaking-newsपुणे

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीय युवकाला पकडले

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय युवकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी चंदन लक्ष्मीकांत सादरा (वय २८, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. मिदनापूर, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली.

आंबेगाव भागात एक जण देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस नाईक उज्ज्वल मोकाशी आणि उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांना मिळाली.

पोलिसांनी तेथे सापळा रचला. त्या वेळी एक जण बंगाली भाषिक वृत्तपत्र घेऊन तेथून जात असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. सादराला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे वृत्तपत्रात गुंडाळलेले पिस्तूल सापडले.

पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. सादराकडे शस्त्र परवाना आहे का, तो कोणाला पिस्तूल विकण्यासाठी आला होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड, प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार आदींनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button