breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: रशियाने कोरोनाची लस तयार केली पण तरी लागणार भारताची मदत

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लशींच्या स्पर्धेत रशियानं पहिला नंबर लावलेला आहे. मात्र जगभरात रशियाच्या लशीवर मात्र सवाल उपस्थित केले जात आहेत. भारतानं मात्र यापूर्वी रशियाच्या लशीच्या उत्पादनात स्वारस्य असल्याचं सांगितलेलं होतं. यासंदर्भात भारताकडून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चाही सुरू होती.

भारतासोबत लशीच्या उत्पादनासंदर्भात करार करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती RDIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दमित्रिएव यांनी दिलेली होती. पुतीन यांनी जगातील पहिली लस रशियानं तयार केली अशी घोषणा केली ही लस अत्यंत प्रभावी आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढवणारी असल्याचा दावा पुतीन यांनी केलेला आहे.

स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचं सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केलेला आहे. रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे. इतक्या लोकांवर चाचणी करणार आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलेलं आहे. रशियान न्यूज एजन्सी TASS हे लशीच्या उत्पादकांनी गुरुवारी ही माहिती दिल्याचं सांगितलं. हैद्रबादमधील बायोलॉजिकल ई (BE) कंपनीनं यासंदर्भात नुकताच एक करार केला. येत्या काळात या चार कंपन्यांच्या लशीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. वृत्तानुसार बायोलॉजिकल ई (BE) आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा या संदर्भात नुकताच एक करार झाला आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या लशीच्या मानवी चाचणीतील दुसरा टप्पा सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button