breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: शहरातील ६३ पत्रकारांची कोरोना पूर्व तपासणी, श्रमिक पत्रकार संघाचा पुढाकार

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने; महापौर मुरलीधर मोहोळ ,पुनीत बालन ग्रुप आणि मेट्रो मेडिकल फाऊंडेशन आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड येथील पत्रकारांची कोरोना पूर्व तपासणी करण्यात आली.

या तपासणी शिबिरामध्ये शहरातील ६३ पत्रकारांनी सहभाग घेतला होता. या तपासणीमध्ये एकाही पत्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत. सर्व पत्रकारांच्या तपासणीचे अहवाल चांगले आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी तपासणी शिबिराला भेट दिली. तसेच तपासणीही करून घेतली.  तपासणी शिबिरासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी ऑटो कॅल्टर येथे तपासणीचे सर्व नियोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button