breaking-newsमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचे कोरोनाने निधन

मुंबई – बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ अस्लम खान (88) यांचे निधन झाले आहे. अस्लम खान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (90) आणि अस्लम खान (88) या दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अस्लम खान यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधित काही समस्यादेखील होत्या. त्यातच आज उपचारादरम्यान अस्लम खान यांचे निधन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button