TOP Newsताज्या घडामोडीपुणे

उच्च शिक्षितांनी रस्त्यावरच पेटवले राज्य शासनाच्या नावाने दिवे

राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असल्याने  नेट, सेट, पीएच.डी. धारक तरुणांनी सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी राज्यभरात सत्याग्रह आंदोलन गुरुवारी सुरू केले. नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समितीने पुण्यातील उच्च शिक्षण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, राज्य शासनाच्या नावाने रस्त्यावरच दिवे पेटवण्यात आले.

केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शंभर टक्के सहायक प्राध्यापक भरती करणे, तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन,  २ हजार ८८ पदांसाठी सुरू असलेली प्राध्यापक भरती गतीमान करून पुढील शंभर टक्के सहायक प्राध्यापक भरती सुरू करावी, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नेमणूक करावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. प्राध्यापक भरती करण्याच्या आश्वासनावर उच्चशिक्षित बेरोजगारांची केवळ बोळवण करण्यात आली. दैनंदिन जीवनाचा गाडा चालवणे अशक्य झाल्याने लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आता शासनाने लवकरात लवकर वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी समितीने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button