breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण

जगातील इतर देशांप्रमाणेच रशियातील स्थिती करोनामुळे चिंताजनक बनत चालली आहे. रशियाच्या संसदेनं देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे अधिकार दिलेले असतानाच रशियाच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या आठवड्यात व्लादिमीर पुतीन यांना करोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात फिरवून माहिती देणाऱ्या डॉक्टरलाच करोनाचा संसर्ग झाला आहे. लक्षणं दिसून आल्यानंतर डॉक्टरची तपासणी करण्यात आली. यात त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या मॉस्कोतील मुख्य रुग्णालयाला मागील आठवड्यात भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणीही केली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डेनिस प्रोटेन्को यांनी रुग्णालयातील सुविधांविषयी माहिती दिली. या भेटीवेळी डॉ. डेनिस यांनी मास्क वा इतर कोणताही स्वःसुरक्षा पोशाख घातलेला नव्हता. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दिसत आहे.

या भेटीच्या एका आठवड्यानंतर डॉ. डेनिस यांना करोनाचं निदान झालं. त्यानंतर डॉ. डेनिस यांनी याची फेसबुकवरून माहिती दिली. ‘मला करोना व्हायरची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण, मला थोडसं बरंही वाटत आहे. माझ्या कार्यालयातच मी स्वतःला विलग करून घेतलं आहे. मला वाटत या महिन्यात जी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली, ती तिचं काम करेल,’ असं डेनिस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button