breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Coronavirus: मुंबईत २५ हजार कोरोनाबाधित

मुंबई : मुंबईमध्ये करोनाचे थैमान सुरूच असून गुरुवारी दिवसभरात तब्बल १३८२ जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहोचली. तर गुरुवारी ४२ करोनाबाधित मृत्युमुखी पडले असून आतापर्यंत ८८२ करोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढतोच आहे. करोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक व विलगीकरणात ठेवलेल्यांना जेवणाचा पुरवठा करणारे पालिका कर्मचारीही करोनाबाधित होऊ लागले आहेत. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ७७७ करोना संशयितांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २२ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर गुरुवारी एक हजार ३८२ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालावरुन उघड झाले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहोचली आहे. गुरुवारी ४२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button