breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! राजेंद्रसिंह गुढांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटर्तीय राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेंद्रसिंह गुढा हे राजस्थानमधील एक मोठं नेतृत्व असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजेंद्रसिंह गुढा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कोण आहेत राजेंद्रसिंह गुढा?

राजेंद्रसिंग गुढा यांचा राजकारणात पहिला प्रवेश २००८ मध्ये झाला होता. गुढा यांनी २००८ मध्ये बसपाच्या तिकिटावर काँग्रेसचे विजेंद्र सिंह आणि भाजपचे मदनलाल सैनी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. यामध्ये ते सुमारे ८ हजार मतांनी विजयी झाले. २००८ मध्ये बसपकडून निवडणूक जिंकल्यानंतर गुढा यांनी बसपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गुढा यांना त्यांच्या उदयपुरवती मतदारसंघातून उमेदवारी दिली, परंतु त्यावेळी गुढा यांचा पराभव झाला. याच कारणामुळे काँग्रेसने २०१८ मध्ये त्यांचे तिकीट रद्द केले.

हेही वाचा – G२० परिषदेमध्ये या २० देशांचा समावेश! जाणून यामागचा उद्देश

२००८ मध्ये गुढा पुन्हा बसपामध्ये सामील झाले. २००८ च्या निवडणुकीत बसपने गुढा यांना पुन्हा पक्षात येण्याची संधी दिली. त्यानंतर गुढा पुन्हा बसपामध्ये दाखल झाले. यावेळी बसपाने उदयपुरवती मतदारसंघातून गुढा यांना तिकीट दिले. यावेळी त्यांची लढत भाजपचे उमेदवार शुभकरन चौधरी आणि काँग्रेसचे भगवान राम सैनी यांच्याशी होती. या तिरंगी निवडणुकीत गुढा यांनी बाजी मारली. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर गुढा यांनी मंत्रिपदासाठी बसपाशी दगाबाजी करत पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेहलोत सरकारने त्यांना राज्यमंत्री केले. पण गेहलोत-पायलट वादात त्यांनी पायलट गटाचे जोरदार समर्थन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button