breaking-newsटेक -तंत्र

BSNL चा नवा १४९९ रुपयांचा प्लान, ३६५ दिवसांसाठी डेटा-कॉलिंग

नवी दिल्ली– सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल ने १४९९ रुपयांचा नवीन प्लान प्रीपेड प्लान आणला आहे. या प्लानची एक वर्षाची वैधता आहे. ज्यात ग्राहकांना डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग यासारखी सुविधा मिळते. कंपनीने या प्लानची घोषणा बीएसएनएल चेन्नईच्या ट्विटर अकाउंटवर केली आहे. या प्लानचे नाव PV 1499 आहे. हा प्लान १ सप्टेंबर २०२० पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

बीएसएनएलचा १४९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा १४९९ रुपयांचा प्लान मध्ये ३६५ दिवसांची वैधता आहे. या दरम्यान ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १०० एसएमएस दिले जाते.

या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे प्रमोशनल ऑफर अंतर्गत सुरुवातील ९० दिवसांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जाते. याप्रमाणे ग्राहकांना ३६५ दिवसांऐवजी ३९५ दिवसांची वैधता मिळते. या प्लानला अॅक्टिवेट करण्यासाठी बीएसएनएल वेबसाइट वर जावून करू शकते. तसेच आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून १२३ नंबर वर PLAN BSNL1499 एसएमएस करून करू शकता.

एक वर्षाचा अन्य प्लान
कंपनी ३६५ रुपयांचा दुसरा प्लान ऑफर करते. ज्यात ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जाते. यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा केवळ सुरुवातीच्या ६० दिवसासाठी मिळते. त्यानंतर ग्राहकांना व्हाऊचर्सचा वापर केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button