breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

CoronaVirus: मुंबईत समूह सहलीवरही बंदी, कलम १४४ लागू

कोराना व्हायरसच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. टूर अ‍ॅण्ड ट्रव्हल्स कंपनीच्यावतीने आयोजित समूह सहलीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरात कलम १४४ लागू करत जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, सद्यपरिस्थितीत खासगी टूर अ‍ॅण्ड ट्रव्हल्स किंवा अन्य कोणालाही समूहाने सहल काढायची असेल तर मुंबई आयक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विना परवाना सहल काढल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी हस्तांदोलनाएवजी नमस्कार करण्याचा सल्ला दिला होता.      

स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी हस्तांदोलन करणे टाळावे. अभिवादन करत असताना नमस्कार करण्याची खबरदारी घ्यावी, असे  मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते. पोलिस स्टेशनवरील कर्मचारी तसेच वाहतूक पोलिसांना मास्क पुरवले आहेत, अशी माहितीही मुंबई पोलिसांनी दिली होती.   

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची खबरदारीसंदर्भात मुंबई पोलिसांनी अधिकृत अकाउंटवरुन ट्विट करत मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, प्रिय मुंबईकरांनो गर्दी करु नका तसेच प्रवास अनावश्यक प्रवास टाळा, अशा सूचना मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे. चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने जगभरात दहशतीचा माहोल निर्माण झाला आहे. 

चीनच्या वुव्हानमध्ये कोरोचा विषाणूचा प्रभाव कमी झाला असला तरी जगभरात त्याचे संक्रमण वेगाने पसरत आहे. देशात शंभरहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ३० हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आणखी एक पाऊल उचलत सहली काढण्यावर बंदी घातली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button