breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
संतपीठाच्या निविदेत भाजपचा भ्रष्टाचार?, महासभेत राष्ट्रवादीचे आंदोलन
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संतपीठाच्या निविदेत सत्ताधारी भाजपाने रिंग केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आज महापालिकेत सत्ताधा-यांच्या विरोधात आंदोलन केले. सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लिखीत पेहराव परिधान करून भाजपचा निषेध केला.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करणयात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवकांचा आंदोलनात सहभाग आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. सर्वसाधारण सभेत भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.