breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Coronavirus : मुंबईतील जिम, नाट्यगृहे, स्विमिंग पूल,चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आणि नागपूर या ठिकाणच्या व्यायामशाळा (जिम), नाट्यगृहे, जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी विधानसभेत जाहीर केले. ३० मार्चला याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

नागरिकांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणूनच केवळ या शहरांमधील व्यायामशाळा (जिम), नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात या कोरोनामुळे बाधित असलेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सध्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे स्वतःहून टाळले पाहिजे. अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button