breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावात कोरोनाचा कहर सुरुच; आणखी नऊ पोलिसांना लागण
गेल्या चोवीस तासात सात पोलीस व राज्य राखीव दलाचे दोन जवान अशा नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या आता ३३५ वर पोहोचली आहे. यापूर्वी २७ राज्य राखीव दलाचे जवान व एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सतरा पोलिसांना करोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले होते.
आता पुन्हा पोलीस दलातील नऊ जणांना करोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी पहाटे प्राप्त झालेले सर्व ५२ अहवाल नकारात्मक आले होते. त्यानंतर दुपारी आणखी ३० अहवाल प्राप्त झाले. त्यात शहरात बंदोबस्तासाठी जळगावहून आलेल्या एका पोलिसाचा अहवाल सकारात्मक आला असून अन्य २९ अहवाल नकारात्मक आहेत. सायंकाळी पुन्हा अठ्ठेचाळीस अहवाल प्राप्त झाले. त्यात राज्य राखीव दलाचे दोन जवान व सहा पोलीस अशा आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.