breaking-newsपुणेमहाराष्ट्र

एल्गार परिषदेच्या अरूण परेरांना अटक

एल्गार परिषदेच्या अरूण परेरांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील शारॉन को ऑपरेटिव्ह सोसायटीतून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून ही अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे असेही समजते आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर अरूण परेराला नजरकैदेत ठेवण्यात आलं होत. आता त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे.

कोण आहेत अरुण परेरा 
मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून अरूण परेरा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबई मानवाधिकार चळवळीतील ते महत्त्वाचे नेते मानले जातात. २००७ मध्ये परेरा यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी त्यांना ११ प्रकरणांमध्ये आरोपी केले होते. २०११हीमध्ये पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका झाली होती. २०१६ मध्ये अरूण परेरा यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केले. ते सध्या वकिल म्हणूनही काम करतात
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button