breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ

अकोला  शहरात करोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे. सलग सातव्या दिवशी नऊ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६४ झाली, तर आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाने शिरकाव केला आहे.

समूह संक्रमणामुळे अकोला जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. सोमवारी एकूण ११३ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १०४ अहवाल नकारात्मक, तर नऊ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील सहा जणांचा मृत्यू व एकाने आत्महत्या केली. आतापर्यंत १३ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत ४४ करोनाबाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button