breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात १५७६ नवे कोरोना रुग्ण, ४९ मृत्यू, रुग्णसंख्या २९ हजारांच्याही पुढे

महाराष्ट्रात करोनाचे १५७६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर ६ हजार ४५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात १०६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २९ हजार १०० इतकी झाली आहे. आज ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button